लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : काम संपवून रात्री उशिरा घरी जाणाऱ्या नोकरदारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने स्वारगेट परिसरात जेरबंद केले. त्यांच्याकडून मिरची पावडर, लोखंडी रॉड, दुचाकी, मोबाईल असा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अक्षय किशोर शिंदे (वय २८, रा. केशवनगर), सतीश दशरथ साळुंखे (वय ५० रा. रासकर मळा), अनिल शंकर जाधव (वय ४०) आणि संदीप बाबूलाल कोरी (वय २७, रा. पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार योगेश माने (वय ४०) फरार आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई कादीर शेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे युनिट दोन पथक मंगळवारी (ता. २२) स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना काहीजण नोकरदारांना लुटण्याच्या तयारीत स्वारगेट परिसरात थांबले असल्याची माहिती मिळाली होती.