दुचाकी चोरट्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरट्यास अटक
दुचाकी चोरट्यास अटक

दुचाकी चोरट्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : शहरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने केलेले घरफोडी आणि लूटमारीचे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अब्दुल मोहमंद शेख (वय १९, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख सराईत चोरटा आहे. घरफोडी, वाहनचोरीचे गुन्हे करणारा चोरटा इस्कॉन मंदिराजवळ थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. त्याने कोंढवा, वानवडी, चतुःशृंगी, हडपसर तसेच सासवड परिसरात वाहनचोरी, घरफोडी आणि लूटमारीचे गुन्हे केल्याची कबुली चौकशीत दिली.