मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर ‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर ‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर ‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : दैनिक सकाळच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशन आणि पुण्यातील व्हीजन नेक्स्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत बोपोडी येथील व्हीजन नेक्स्ट फाउंडेशन आय हॉस्पिटलमध्ये व रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलमधील व्हीजन नेक्स्ट फाउंडेशन आय केअर सेंटरमध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे सकाळ सोशल फाउंडेशन व व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. तपासणीनंतर ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून औषधोपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंबरीष दरक यांनी दिली.

शिबिरात सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८८०६४३०००४