औषधी कॅप्सुलमध्ये चक्क सोन्याची भुकटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधी कॅप्सुलमध्ये
चक्क सोन्याची भुकटी
औषधी कॅप्सुलमध्ये चक्क सोन्याची भुकटी

औषधी कॅप्सुलमध्ये चक्क सोन्याची भुकटी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले. तिच्याकडून २७० ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. महिलेने औषधांच्या कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी लपविल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात केंद्रीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तस्करी करणारी महिला मूळची दिल्लीतील आहे. पुणे-बँकॉक या विमानाने महिला लोहगावमधील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. महिला बँकॉकहून पुण्यात आली होती. विमानतळावर घाईत निघालेल्या महिलेला कस्टमच्या पथकाने पाहिले. संशय आल्याने कस्टमच्या पथकाने तिला अडवून चौकशी केली. तिच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा औषधी कॅप्सूल सापडल्या. कॅप्सुलमध्ये महिलेने सोन्याची भुकटी लपविल्याचे तपासणीत उघड झाले. कॅप्सुलमधून २७२ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुणे-बँकॉक विमानसेवा नुकतीच सुरू करण्यात आली. त्यानंतर बँकॉकहून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा पहिला प्रकार उघडकीस आला.