दिव्यांगांसाठी आर्थिक समावेश कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांसाठी आर्थिक समावेश कार्यशाळा
दिव्यांगांसाठी आर्थिक समावेश कार्यशाळा

दिव्यांगांसाठी आर्थिक समावेश कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः दीपस्तंभ मनोबल पुणे, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि युनियन बँक यांच्यातर्फे दिव्यांगासाठी नुकतीच आर्थिक समावेश कार्यशाळा झाली. कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींसाठी बॅंकेकडून मिळणाऱ्या कायदेशीर हक्कांबाबत तसेच नवे तंत्रज्ञान आणि त्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मोबाईल ॲप व वेबसाइट ॲपचे प्रात्यक्षिक युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून दाखवण्यात आले. कार्यशाळेला युनियन बँकेच्या कल्याणी चित्ता, विमाननगर शाखेचे मॅनेजर नितीन पवार, मार्केटिंग मॅनेजर प्रसाद वैद्य यांनी मार्गदर्शन केले. नॅबच्या मीनाक्षी चंदवानी, दीपस्तंभचे फैयाज अत्तार, सीमा सावंत, योगेश शार्दुल आणि दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.