बारामतीतील हल्ल्याप्रकरणी चौघांना मोका कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील हल्ल्याप्रकरणी चौघांना मोका कोठडी
बारामतीतील हल्ल्याप्रकरणी चौघांना मोका कोठडी

बारामतीतील हल्ल्याप्रकरणी चौघांना मोका कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : खंडणी दिली नाही म्हणून बारामती शहरातील हॉटेल चालकासह कामगारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चार सराईत आरोपींना न्यायालयाने दहा दिवस मोका कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा आदेश दिला. आदेश संजय कुचेकर (वय २२), साहिल अय्याज शिकीलकर (वय १९), ऋषिकेश ऊर्फ पप्पू सुनील चंदनशिवे (वय २१) आणि तेजस बाळासाहेब बच्छाव (वय २३, सर्व रा. बारामती) अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी एकावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका), तसेच खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे यांसह विविध कलमांनुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षाच्या हॉटेल चालकाने फिर्याद दिली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फलटण रोड, बारामती येथे घडली. आरोपींना मोका कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.