ट्रॅव्हल्स चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅव्हल्स चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक
ट्रॅव्हल्स चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

ट्रॅव्हल्स चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : सोलापूर-पुणे मार्गावरून जात असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये चढून चार ते पाच जणांना टोळक्याने चालकाच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट सहाने दोघांना अटक करीत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. कुंजीरवाडी येथे हा प्रकार घडला होता.
रोहित अरुण पवार (२०) आणि आदित्य संजय लोखंडे (२०, रा. शिवमंदिराजवळ, गोंधळेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गुन्ह्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हेशाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर येथील उद्यानाशेजारी असलेल्या एका मैदानात बसल्याचे समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी त्यांना पाहून पळत असताना त्याला पकडले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर यांच्या पथकाने केली.