विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा ः जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा ः जिल्हाधिकारी
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा ः जिल्हाधिकारी

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा ः जिल्हाधिकारी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी अधिक सुविधा देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब साळुंके यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या आयोजनासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन केली आहे. सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल.
कर्णिक म्हणाले, नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या. तसेच, सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

काय सुविधा देणार
- वाहनतळांची संख्या वाढविणार
- पाण्याचे १५० टँकर
- दीड हजार फिरती स्वच्छतागृह
- पीएमपीच्या ३६० बसेस
- ३० रुग्णवाहिका, दुचाकी आरोग्य पथके
- अग्निशमन वाहनांची व्यवस्था
- आरोग्य सुविधेसाठी १४० वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी
- पाच हजार पोलिस कर्मचारी
- खासगी रुग्णालयांना खाटा आरक्षित
- परिसरातील वाहतूक वळविणार
- सह्याद्री वाहिनीवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण