मधु-स्मृती संगीत समारोहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधु-स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
मधु-स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

मधु-स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः मधु-स्मृती या शास्त्रीय संगीत समारोहाच्या माध्यमातून पुणेकर रसिकांना शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताची पर्वणी मिळणार आहे. स्व. मधुकर खांडवे आणि स्व. मधुकर हस्तक या संगीत प्रेमी रसिकांच्या स्मृती प्रित्यर्थ शुक्रवारी (ता. ३०) हे शास्त्रीय संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संगीत शिक्षणाला समर्पित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. विद्या खांडवे, मोहन खांडवे आणि रवींद्र दुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. खांडवे म्हणाल्या, ‘‘अभिजात शास्त्रीय संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रमुख अंग आहे. शास्त्रीय संगीताच्या या देदीप्यमान परंपरेला समृद्ध करून रसिक श्रोत्यांची अभिजात संगीताप्रती आस्था वाढावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘मधु-स्मृती’ शास्त्रीय संगीत समारोह या उपक्रमांतर्गत अशाच प्रकारचे संगीत समारोह पुण्यासह मुंबई, नागपूर, अमरावती आदी शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३०) संध्याकाळी पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.’’