शौर्यदिनाचे नियोजन अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौर्यदिनाचे नियोजन अंतिम टप्प्यात
शौर्यदिनाचे नियोजन अंतिम टप्प्यात

शौर्यदिनाचे नियोजन अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी उत्सव समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे कार्य पार पाडले जात आहे, अशी माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी रिपाईच्या शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे, अर्चना केदारी, दीपिका भालेराव आदी उपस्थित होत्या. डंबाळे म्हणाले, ‘‘कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरते शौचालय, वाहन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज, अनुयायांना बसण्यासाठी मंडपव्यवस्था आदी उपलब्ध केले जाणार आहे, तसेच कार्यक्रमादरम्यान नेत्यांच्या अभिवादन सभा विजयस्तंभापासून १०० मीटर लांब होणार आहेत, तसेच या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाणे तसेच लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील मद्य विक्रीस बंदीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, नियोजनाच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख व सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात आले आहे.’’
----------------