स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्तीची कोथरूड-कर्वेनगरमध्ये मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्तीची 
कोथरूड-कर्वेनगरमध्ये मागणी
स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्तीची कोथरूड-कर्वेनगरमध्ये मागणी

स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्तीची कोथरूड-कर्वेनगरमध्ये मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः कोथरूड- कर्वेनगर भागातील लोकसंख्या विचारात घेता या परिसरात महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी आहेत, तसेच असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी भाजप महिला आघाडीने वारजे - कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाला साकडे घातले.

एरंडवणे, नळस्टॉप परिसर, पाडळे पॅलेस, खिलारे वस्ती, शाहू लक्ष्मी वसाहत आदी परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. असलेल्या स्वच्छतागृहांत दारे, खिडक्या, कडी-कोयंडा, वीज, पाणी आदी सुविधांची वानवा आहे. त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन स्वच्छता, देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करते, परंतु नेटकी अंमलबजावणी होत नाही. म्हणून भाजप महिला मोर्चाच्या कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वारजे - कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांची भेट घेतली. स्वच्छता, देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला, तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

गुर्रम यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांची कामे तातडीने सुरू होतील, मोबाईल टॉयलेटबाबतही प्रशासन काही उपाययोजना करेल, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात शीतल गुंड, सुप्रिया माझिरे, सुवर्णा काकडे, पल्लवी गाडगीळ, निर्मला रायरीकर, रूपाली मगर आदींचा समावेश होता.
---------------