वि. प्र.तर्फे बालनाट्य स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वि. प्र.तर्फे बालनाट्य स्पर्धा उत्साहात
वि. प्र.तर्फे बालनाट्य स्पर्धा उत्साहात

वि. प्र.तर्फे बालनाट्य स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दीनिमित्त आयोजित आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष डॉ. हिरेन निरगुडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या उज्ज्वला पिंगळे आणि उद्योजक योगेश संत उपस्थित होते.
या स्पर्धेत ‘लॉकडाऊनमधील शाळा’, ‘मला आजी हवी’, ‘पक्ष्यांची कैफियत’, ‘पर्यावरण रक्षण’ आदी विषयांवरील नाटिका सादर झाल्या. यात एकूण नऊ शाळांनी सहभाग घेतला. जतिन पांडे आणि स्वाती केळकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या प्रसारिणी सभेचे प्रभारी कार्यवाह डॉ. सतीश गवळी आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे यांच्या हस्ते पार पडले. नाट्य समितीच्या प्रमुख वैजयंती जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद खिरे यांनी केले. प्रशालेच्या उपप्राचार्या मनीषा हवालदार यांनी आभार मानले.