छळास कंटाळून महिलेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छळास कंटाळून महिलेची आत्महत्या
छळास कंटाळून महिलेची आत्महत्या

छळास कंटाळून महिलेची आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना हडपसरमधील त्रिवेणीनगरमध्ये घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून, इतर नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपाली अमित जाधव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती अमित रंगनाथ जाधव (वय ४०, रा. हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. दीपाली यांचे भाऊ सूरज वाळके (रा. दिघी) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि दीपाली यांचे २००८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर अमित हा पत्नी दीपालीला शिवीगाळ करीत मारहाण करीत होता. इतर नातेवाईकही दीपालीचा छळ करीत होते. त्यामुळे छळास कंटाळून तिने २१ डिसेंबरला राहत्या घरी आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक सी. सी. थोरबोले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
-------------