शहरात घरफोडीच्या चार घटना; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात घरफोडीच्या चार घटना;
साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस
शहरात घरफोडीच्या चार घटना; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस

शहरात घरफोडीच्या चार घटना; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : कात्रज, लोहगाव, कोंढवा बुद्रूक आणि कोंढवा खुर्द अशा चार ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरला.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुनंदनपार्क येथील, कात्रज- कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर आणि कात्रजमधील संतोषनगरमध्ये सदनिका फोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी जमीर नजररूद्दीन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोहगाव येथील सुयश मेडीकलच्या शटरचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील सात हजार ५०० रुपयांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी सुनील कृष्णा सोनवणे (वय ३४, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

कोंढवा बुद्रूक येथील शांती हाईट्स येथील सुभाष शाहबादी (वय ५४) यांची सदनिका फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड चोरली. २२ डिसेंबरला सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोंढव्यात झालेल्या दुसऱ्या घरफोडीत चोरट्यानीं नासीर अब्दलजबार शेख (वय ४९, कोंढवा खुर्द) यांच्या बाल्कनीतून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर उघडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम महत्त्वाची कागदपत्रे असा ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.