Wed, Feb 1, 2023

दुचाकी घसरून तरुणाचा अपघाती मृत्यू
दुचाकी घसरून तरुणाचा अपघाती मृत्यू
Published on : 23 December 2022, 2:52 am
पुणे, ता. २३ : भरधाव वेगात दुचाकी चालवित असताना घसरून स्वतःच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा प्रकार वारजेतील पाटीलनगर येथील अॅक्युटेप कंपनीसमोर घडला. शैलेश अंकुश थोरात (वय २९, रा. शिवणे) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार दीपक भावराव येणारे यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला होता.