ज्येष्ठ नागरिकाकडून उकळले एक लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकाकडून उकळले एक लाख
ज्येष्ठ नागरिकाकडून उकळले एक लाख

ज्येष्ठ नागरिकाकडून उकळले एक लाख

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘सरप्राईज फॉर यू’ म्हणत पाठविलेली लिंक ओपन करण्यास सांगून ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नग्न अवस्थेतील फोटो, व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन एक लाख १३ हजार रुपये उकळले. वारजे परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना व्हॉटसअपवर मेसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये ‘सरप्राईज फॉर यू’ अशा आशयाची लिंक होती. ती लिंक त्यांना क्लिक करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मोबाईलधारक व्यक्तीने फिर्यादी यांचे नग्न अवस्थेतील फोटो फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून वेळोवेळी खंडणी उकळली.
------------------