बलात्कारप्रकरणी तरुणाला पंधरा वर्षांची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारप्रकरणी तरुणाला पंधरा वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी तरुणाला पंधरा वर्षांची शिक्षा

बलात्कारप्रकरणी तरुणाला पंधरा वर्षांची शिक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने पंधरा वर्षे तुरुंगवास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम मुलीला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

विनोद हनुमंत गायकवाड असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेच्या दिवशी मुलीच्या शाळेला सुट्टी होती. त्यामुळे ती घरी होती, तर तिचा छोटा भाऊ आणि आई घरात नव्हते. याचा गैरफायदा घेऊन तो घरात आला आणि त्याने मुलीवर अत्याचार केला. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास आई आणि भावाला जीवे मारण्याची त्याने धमकी दिली. त्यानंतर दोनदा घरी येत त्याने मुलीशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीने बाळाला जन्म दिला आहे, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. सहायक सरकारी वकील लीना पाठक यांनी या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले. सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो मान्य करीत न्यायालयाने आरोपीला पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली.
------------------