
नाताळामुळे आजपासून वाहतुकीत बदल
पुणे, ता. २३ : नाताळानिमित्त सण साजरा करण्यासाठी शनिवारी (ता. २३) संध्याकाळपासून होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. शनिवारी (ता. २४) सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दीसंपेर्यत हे बदल करण्यात आले माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाय जंक्शन वरून एम. जी. रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ही बंद करून सदरची वाहतूक एसीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीन तोफा चौकातून सहर लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात आली आली आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाण्याच्या चौकाकडे वळविण्यात येणार आहे. तसेच सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार ऊन ही वाहतूक ताबूत स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.