Sat, Feb 4, 2023

अवतीभवती
अवतीभवती
Published on : 24 December 2022, 1:45 am
‘विद्यावर्धिनी’तर्फे प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : विद्या प्रसारिणी सभेचे विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित प्रदर्शन उत्साहात पार पडले. विज्ञान, पर्यावरण, तंत्रज्ञान व भाषा प्रकल्प हा प्रदर्शनाचा विषय होता. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या टिकाऊ वस्तुंचे प्रदर्शनही या वेळी भरविण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन शिंगरे, सहकार्यवाह डॉ. सतीश गवळी, डॉ. सुभाष मेहता, प्रमोद कुदळे, साधना कुदळे आदी उपस्थित होते. मोहिनी भोकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर पी. राजेश्वरी यांनी आभार मानले.