नाताळातही थंडीची अनुभूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळातही थंडीची अनुभूती
नाताळातही थंडीची अनुभूती

नाताळातही थंडीची अनुभूती

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः उत्तरेकडील राज्यात गारठा वाढला असून पुणेकरांना नाताळात काहीशा थंडीची अनुभूती होणार आहे. सध्या शहरातील किमान तापमानात चढ-उतार कायम असून गारठाही कमी-जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. शनिवारी (ता. २४) शहरात ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहेत. हवामानाची ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढला असून काही ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. त्यात राज्यातही कोरड्या हवामानाची स्थिती असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात काहीशी घट झाली. राज्यातील नीचांकी तापमान नाशिक येथे १०.३ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र असे असले तरी कोकण वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान हे सरासरी व त्यापेक्षा एक ते तीन अंशांनी वाढले आहे. दरम्यान रविवारी (ता. २५) उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान दिल्ली, उत्तर राजस्थान, पंजाब, चंडीगड व हरियाना येथे थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात किमान तापमानातील घट कायम राहू शकते, असेही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.