जमीन एनए करण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन एनए करण्याची संधी
जमीन एनए करण्याची संधी

जमीन एनए करण्याची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : कोणत्याही गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटरच्या परिघातील जमीन ही देय रक्कम शासनजमा करून अकृषिक (एनए) करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. गावठाणापासून दोनशे मीटर क्षेत्रातील जमीन निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रूपांतरित केली असल्याचे मानण्यात येणार आहे. ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येईल. आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर जमीन अकृषिक करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया मोहिम स्तरावर राबविण्यात येणार आहे. नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा नियमानुसार जमिनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे. जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांच्या पूर्तता करण्याचीही आवश्यकता असणार नाही.
भोगवटादाराने रक्कम भरल्यापासून ६० दिवसांच्या कालावधीत नमुन्यात सनद देण्यात येईल. त्यानुसार ही जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल. मिळकतधारकांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.