चोवीस मिटरचा रस्ता तातडीने मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोवीस मिटरचा रस्ता तातडीने मार्गी लावा
चोवीस मिटरचा रस्ता तातडीने मार्गी लावा

चोवीस मिटरचा रस्ता तातडीने मार्गी लावा

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः बावधन बुद्रूक येथील पौड रस्त्याकडून मुंबई- बंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा ताब्यात येऊन देखील २४ मीटर रुंदीचा रस्ता न केल्याने या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता त्वरित करावा, अशी मागणी येथील सोसायट्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

चांदणी चौकाच्या परिसरात बावधन बुद्रूक येथे २४ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता पुढे ६५ मीटरच्या रिंगरोडला जाऊन मिळणार आहे. या रस्त्याच्या परिसरात विंडमील, स्टारगेझ, पद्मावती हिल्स, आदित्य निसर्ग यासह अनेक सोसायट्यांना हा रस्ता अद्याप झालेला नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
बावधन बुद्रूक येथे पौड रस्त्यावरून मुंबई- बंगळुरू महामार्गाला जोडणारा रस्त्यासाठी जागा संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी पीएमआरडीएकडे हस्तांतरित केली आहे. हा रस्ता आपल्या विभागाकडून करून दिल्यास पौड रस्त्याकडून हिंजवडीकडे जा- ये करण्यासाठी सोईचा ठरेल. तसेच हा रस्ता झाल्यास महामार्गावरील ताण कमी होईल व चांदणी चौकातील वाहतूक कोंडीही कमी होईल, अशी मागणी सचिन बालघाटे यांनी दिली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.


म्हणून २४ मीटरचा रस्ता उपयुक्त

- बावधन बुद्रूकमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने लोकसंख्येत वाढ
- पौड रस्त्याकडून पुण्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी
- स्थानिकांचे ६ किलोमीटरचे अंतर कमी होणार, १५ मिनिटांचा वेळ वाचणार