चार रस्त्यांच्या सफाईसाठी साडेतीन कोटींचा खर्च तीन रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी साडेतीन कोटीचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार रस्त्यांच्या सफाईसाठी साडेतीन कोटींचा खर्च 


तीन रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी साडेतीन कोटीचा खर्च
चार रस्त्यांच्या सफाईसाठी साडेतीन कोटींचा खर्च तीन रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी साडेतीन कोटीचा खर्च

चार रस्त्यांच्या सफाईसाठी साडेतीन कोटींचा खर्च तीन रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी साडेतीन कोटीचा खर्च

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : बंडगार्डन रस्ता, संगमवाडी रस्ता, रेल्वे स्टेशन, कोरेगाव पार्क या रस्त्यांची स्वच्छता व साफसफाई पुढील तीन वर्षे यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी ३ कोटी ४१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठीची निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्याची साफसफाई पारंपरिक आणि यांत्रिक पद्धतीने केली जाते. पंधराव्या वित्त आयोगात यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाईसाठी निधी मिळाला आहे. हा निधी बंडगार्डन रस्ता, संगमवाडी, रेल्वे स्टेशन, कोरेगाव पार्क रस्त्यांसाठी वापरला जाणार आहे. रोड स्वीपर यंत्राच्या माध्यमातून साफसफाई करण्यासाठी निविदा मागविली होती. आलेल्या निविदांमध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रायव्हेट लिमिटेडने सर्वांत कमी ३ कोटी ४१ लाख १३ हजार २०६ रुपयांची निविदा भरली. पहिल्या वर्षासाठी १ कोटी ५ लाख ९७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षासाठी १ कोटी ११ लाख ५८ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी १ कोटी २३ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते साफ करताना पहिल्या वर्षी प्रति किलोमीटर ८४९ रुपये, दुसऱ्या वर्षासाठी प्रति किलोमीटर ८९४ रुपये, तिसऱ्या वर्षासाठी ९९० रुपये प्रति किलोमीटरचा दर प्रस्तावित केला आहे.