अनिल देसार्इ यांनी दिलेली तक्रार दिशाभूल करणारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल देसार्इ यांनी दिलेली तक्रार दिशाभूल करणारी
अनिल देसार्इ यांनी दिलेली तक्रार दिशाभूल करणारी

अनिल देसार्इ यांनी दिलेली तक्रार दिशाभूल करणारी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासासंदर्भात दिशाभूल करणारी खोटी माहिती तक्रार स्वारगेट पोलिस ठाण्यात अनिल देसाई यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे अनिल देसाई व मनिषा धारणे या दोन व्यक्ती आमच्या न्यासाच्या सध्या सभासद नाहीत. उलट, न्यासाने दाखल केलेल्या दोन फौजदारी प्रकरणात ते दोघेही आरोपी आहेत, अशी माहिती न्यासाकडून देण्यात आली.
आमच्या विरुद्ध करण्यात आलेली एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण, जी सभासद यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने एक मार्च २०१८ रोजी प्रमाणित केली होती, ती यादी पुष्कराज पाठक यांनी दाखल केली नव्हती. ती संस्थेचे तत्कालीन सचिव भालचंद्र पाठक यांनी संस्थेच्या घटनेतील नियम १६.३ (६) या नियमानुसार दाखल करू प्रमाणित करून घेतली होती. पुढे सभासद यादी प्रमाणिकरणाचा निकाल धर्मादाय सह आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाने कायम केला आहे. न्यासाची कोणतीही जमीन न्यासाने विकावयास काढलेली नाही. त्याबाबतचे स्पष्ट प्रतिज्ञापत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयात मी यापूर्वीच दाखल केलेले आहे, अशी माहिती न्यासचे सचिव पुष्कराज पाठक यांनी दिली.