Tue, Jan 31, 2023

आमदार गोरे यांच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस
आमदार गोरे यांच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस
Published on : 24 December 2022, 4:33 am
पुणे, ता. २४ : आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूबी हॉल रूग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रूबी येथे भेट देऊन आमदार गोरे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली.
आमदार गोरे यांच्या उपचाराविषयी डॉक्टरांना सूचना देऊन ते लवकर बरे व्हावेत, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही सायंकाळी रूबी येथे गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रूबी हॉल हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँड आदी या वेळी उपस्थित होते.