Wed, Feb 8, 2023

सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्सला अटल अचिव्हमेंट ॲवॉर्ड
सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्सला अटल अचिव्हमेंट ॲवॉर्ड
Published on : 25 December 2022, 8:43 am
पुणे, ता. २५ ः महिला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्स’ला अटल अचिव्हमेंट ॲवॉर्डने नुकतेच दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने साधू वासवानी मिशनच्या मीरा शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. जी. एच. गिडवानी आणि सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जया राजगोपालन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मूल्य-आधारित शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन आणि भागधारकांच्या कल्पकतेची, कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची प्रशंसा करण्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य बनवण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.