सोलर बेंचचे नवी पेठेत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलर बेंचचे नवी पेठेत उद्‍घाटन
सोलर बेंचचे नवी पेठेत उद्‍घाटन

सोलर बेंचचे नवी पेठेत उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः नागरिक आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एलईडी प्रकाश व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंगची सुविधा देणाऱ्या सार्वजनिक सोलर बेंचचे उद्‍घाटन नवी पेठेत नुकतेच झाले. एनर्जी सेतू कंपनीच्या कौशिक चौधरी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे कसबा मतदारसंघामधील युवा मोर्चाचे सरचिटणीस केदार मानकर यांनी नवी पेठेत सोलर बेंच ही अभिनव संकल्पना राबविली आहे. या सोलर बेंचचे उद्‍घाटन भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष कुणाल टिळक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजेंद्र काकडे, अमित कंक, शंतनू कांबळे, प्रणव गंजीवाले, चेतन मुंडे व अखिल टिळक रोड दहीहंडी उत्सव समितीचे सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.