
प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत
- सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ः
नगर रोड वाहतूक आणि बीआरटी, शहराचा पाणी प्रश्न, शिवणे-खराडीसह रस्त्याचे प्रश्न, पावसाळ्यात वडगावशेरीसह पुण्यात निर्माण होणारी पूरपरिस्थिती यांसह पुणे शहरासंदर्भातील ६२ तारांकित प्रश्न आणि ६ लक्षवेधी मांडले आहेत. मात्र, एकही पटलावर आलेले नाही. विधानसभाध्यक्षांना भेटून लक्ष वेधले आहे. या आठवड्यात हे प्रश्न चर्चेला घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
- आमदार चेतन तुपे (राष्ट्रवादी) ः
महापालिकेतील कंत्राटी कामगार, बेरोजगारी, कात्रज उड्डाणपूल यांच्यासह पाच विषयांना वाचा फोडली. मी १७८ तारांकित प्रश्न मांडले आहे. त्यापैकी २२ प्रश्न लागले आहेत. लक्षवेधींची संख्या वेगळी. या आठवड्यात हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शहर व परिसराच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.