विमानतळावरून उड्डाणांचा उच्चांक रविवारी उडाली ९५ विमाने; कोरोनानंतरची सर्वाधिक संख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळावरून उड्डाणांचा उच्चांक 
रविवारी उडाली ९५ विमाने; कोरोनानंतरची सर्वाधिक संख्या
विमानतळावरून उड्डाणांचा उच्चांक रविवारी उडाली ९५ विमाने; कोरोनानंतरची सर्वाधिक संख्या

विमानतळावरून उड्डाणांचा उच्चांक रविवारी उडाली ९५ विमाने; कोरोनानंतरची सर्वाधिक संख्या

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : पुणे विमानतळावरून रविवारी विमानांची सर्वाधिक म्हणजे तब्बल ९५ उड्डाणे झाली. कोरोना नंतरच्या विमान वाहतुकीतला हा सर्वांत मोठा आकडा आहे. कोरोनापूर्वी पुणे विमानतळावरून एका दिवशी १०० उड्डाणे झाली. मात्र मागच्या अडीच वर्षांहून जास्त काळाचा विचार केला तर रविवारी पुणे विमानतळावरून १९० विमानांची वाहतूक झाली, यामध्ये प्रवासी संख्या ३१ हजारांच्या पुढे होती. मध्यरात्रीचे काही स्लॉट अद्यापही रिकामेच आहेत. त्याला जर प्रतिसाद मिळाला असता, तर यावर्षी पुणे विमानतळावरून १०० पेक्षादेखील अधिक उड्डाणे झाली असती.

नाताळच्या सुटीचे औचित्य साधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मागच्या आठवड्यापासून अचानक प्रवासी तसेच विमानांच्या संख्येत वाढ होऊ लागली. रोज सुमारे ७५ ते ८० असणारी विमानांची संख्या रविवारी थेट ९५ झाली. यात दिल्लीला जाणाऱ्या विमानांची संख्या सर्वाधिक होती. दिल्लीसाठी २४ विमानांचे तर बेंगळुरूसाठी १४ विमानांचे उड्डाण झाले.

रविवारची वाहतूक :
उड्डाणे : ९५
एकूण वाहतूक : १९०
प्रवासी संख्या : ३१ हजार ४००
आतापर्यंत सर्वाधिक वाहतूक : २०० (कोरोनापूर्वी)
शिल्लक स्लॉट : २० (रात्रीच्या वेळी)
सर्वाधिक उड्डाणे : दिल्ली (२४ )
सर्वांत कमी : १ (मेंगळुरू, कोची, इंदूर)

रविवारी पुणे विमानतळावरून सर्वाधिक ९५ विमानांचे उड्डाण झाले. विंटर शेड्यूलमधील हा आकडा सर्वाधिक आहे. विमानाची संख्या वाढल्याने कनेक्टिव्हिटीही वाढली आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ