पुण्यात सरासरीच्या जवळपास तापमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात सरासरीच्या जवळपास तापमान
पुण्यात सरासरीच्या जवळपास तापमान

पुण्यात सरासरीच्या जवळपास तापमान

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः शहर आणि परिसरात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ कायम आहे. मात्र जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पारा १५ अंशांच्या खाली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील काही भागात रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. पुढील चार दिवस तापमानात किंचित वाढ होऊ शकते. त्यामुळे थंडीतही वाढ आणि घट होऊ शकते.

शहरात रविवारी (ता. २५) १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सध्या पुणे व परिसरात दिवसा उन्हाचे चटके आणी पहाटे व रात्री गारठ्याची अनुभूती येत आहे. सोमवारी (ता. २६) शहर व परिसरात पहाटे धुके पडू शकते. त्यात येत्या बुधवारपर्यंत (ता. २८) तापमानात हलकी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात किमान तापमान १४ ते १९ अंशांच्या जवळपास असेल. त्यानंतर मात्र पुन्हा तापमानात घट अपेक्षित आहे.

राज्याची स्थिती पाहता उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. रविवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे ९.८ अंश सेल्सिअस झाली. नगर आणि औरंगाबाद येथेही पारा १० अंशांच्या घरात नोंदला गेला. उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका कायम असून गुजरात, उत्तर राजस्थान, दिल्ली आदी राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रातही काही भागात थंडी वाढली आहे.