
विद्यापीठात बुधवारी धरणे आंदोलन
पुणे, ता. ः शुल्कवाढ रद्द करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुधवारी (ता.२८) धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. समितीचे सदस्य राहुल ससाणे सांगतात, ‘‘आम्ही गेल्या काही महिन्यापासून संघर्ष करत आहे. आतापर्यंत केलेल्या दोन आंदोलनानंतर विद्यापीठाने उच्चस्तरिय समिती गठित केली आहे. परंतु या समितीने कुठलेही काम केलेले दिसत नाही. समितीने कृती समितीच्या सदस्यांना एकदाही चर्चा करण्यासाठी बोलविले नाही. आम्ही विचारणार केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व वाढीव शुल्कासह विद्यार्थ्यांच्याकडून चलन घेतली गेली आहेत. म्हणून शुल्कवाढ रद्द झालीच पाहिजे यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करतो आहोत.’’ सकाळी दहा वाजता मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.