मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक सर्जरी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक सर्जरी शिबिर
मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक सर्जरी शिबिर

मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक सर्जरी शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर. एम. धारिवाल फाउंडेशनने मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन केले आहे. ७ ते ८ जानेवारी रोजी हे शिबिर शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल रूग्णालयात होणार आहे, अशी माहिती डॉ. पंकज जिंदल आणि अगरवाल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी धारिवाल फाउंडेशनचे उमेश मोहाड, ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान, राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते. डॉ. जिंदल म्हणाले, ‘‘दोन दिवसीय शिबिरात डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम, डॉ. स्वप्ना आठवले, डॉ. प्रशांत केदारी आदी तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. नाकाच्या किंवा हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहेत.’’
या शिबिराची माहिती तसेच नोंदणीसाठी मातोश्री मदनबाई धारिवाल रूग्णालय ०२१३८-२२५५९९/२२४५९९ किंवा ८६०५२२५५९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.