अकाउंटिंग व टॅक्सेशन अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकाउंटिंग व टॅक्सेशन अभ्यासक्रम
अकाउंटिंग व टॅक्सेशन अभ्यासक्रम

अकाउंटिंग व टॅक्सेशन अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : एपीजी लर्निंगतर्फे ‘बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन’ हा एक अत्यंत यशस्वी अभ्यासक्रम गेली काही वर्षे चालवला जातो. उद्योग व सेवांसाठी लागणारी कौशल्ये शिकत असतानाच विकसित व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन तज्ज्ञांनी तयार केलेला हा अभ्यासक्रम आहे. प्रख्यात कन्सल्टिंग आणि ऑडिट संस्थांचे तज्ज्ञ संचालक यामध्ये मार्गदर्शन करतात. अकाउंटिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्‍यांची वाढती मागणी योग्य कौशल्यांसह पूर्ण करण्याचे काम या कोर्सद्वारे होणार आहे. बीकॉम, बीबीए, बीए, बीएस्सी अशा विविध विभागातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२

लोगो- एसआयआयएलसी
शेवगा उत्पादन तंत्र, निर्यात संधी
पुणे, ता. २६ : स्थानिक बाजारात शेवगा शेंगांना पाव किलोला ४० रुपये दर मिळत आहे. दक्षिण भारतात इडली-सांबारमध्ये शेवग्याचा भरपूर वापर होत असल्याने वाढती मागणी आहे. आयुर्वेद औषधींमध्येही शेवग्याचा वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात संधींबाबत माहिती करून देणारी एक दिवसीय कार्यशाळा ७ जानेवारी रोजी आयोजिली आहे. व्यापारीदृष्ट्या व्यावसायिक दृष्टिकोनातून शेवगा लागवडीत भरपूर संधी आहेत. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, रसायनमुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क पंधराशे रुपये.
नाव नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
कार्यशाळेचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे