Fri, Feb 3, 2023

दिलीप आबनावे यांना भारत भूषण पुरस्कार
दिलीप आबनावे यांना भारत भूषण पुरस्कार
Published on : 26 December 2022, 11:56 am
पुणे, ता. २६ : भारत सरकारच्या नीती आयोगातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत भूषण’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दिलीप आबनावे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे मेजर जनरल तेजपाल सिंग रावत यांच्या हस्ते करण्यात आले. आबनावे यांनी केलेल्या समाजसेवेसाठी तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून होत असलेले महिला सबलीकरण आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना झालेल्या मदतीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आबनावे यांनी समाधान व्यक्त केले.