‘शाळेच्या मैदानासाठी केलेल्या खर्चाची चौकशी करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शाळेच्या मैदानासाठी केलेल्या
खर्चाची चौकशी करा’
‘शाळेच्या मैदानासाठी केलेल्या खर्चाची चौकशी करा’

‘शाळेच्या मैदानासाठी केलेल्या खर्चाची चौकशी करा’

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः महापालिकेच्या येरवड्यातील शाळेसाठी एकच मैदान असताना दरवर्षी अंदाजपत्रकात वेगवेगळ्या नावाने तरतूद करून लाखो रुपये खर्च केले जात आहे. त्यानंतर आता तब्बल एक कोटी रुपये खर्च करून मैदानाचे नूतनीकरण सुरू केले आहे. हे काम थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी देऊनही पुन्हा काम सुरू केले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या खर्चाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

मनसेच्या वडगावशेरी विभागातर्फे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. विभाग अध्यक्ष सुनील कदम, मनोज ढोकळ, रूपेश घोलप, प्रशांत कनोजिया आदी उपस्थित होते.
येरवडा येथे प्रभाग क्रमांक ६ मध्ये महापालिकेची शाळा क्रमांक १४३ (मुलांची), क्रीडानिकेतन, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक शाळा, शाळा क्रमांक ९६ आणि अनुसया सावंत शाळा अशा सहा शाळा एकाच ठिकाणी भरतात. या सर्व शाळांसाठी एकच मैदान आहे. या मैदानाच्या विकासाकरीता क्षेत्रीय कार्यालयाने २०१७ ते २०२२ या कालावधीत सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यातच आता शिक्षण विभागाने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मैदान विकसित करण्याचे काम हाती घेतले गेले आहे. आॅक्टोबर महिन्यात हे काम थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर हे काम पुन्हा सुरू केले गेल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला.