प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला 
प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला
प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला

प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला प्रेमसंबधाच्या संशयातून वाद, पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर जीवघेणा हल्ला

sakal_logo
By

पुणे ः प्रेमसंबधाच्या संशयातून झालेल्या भांडणामध्ये एकाने महिलेच्या पतीवर कोयत्याने वार केला. ही घटना १३ डिसेंबर रोजी संगमवाडी परिसरात घडली आहे. त्यामध्ये महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर येरवडा पोलिसांनी संशयित आरोपीस तत्काळ अटक केली. कानिफनाथ ऊर्फ कानक्‍या कोलार (वय ४०, रा. संगमवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित आरोपी कानक्‍या हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसमवेत कौटुंबीक कारणातून वाद झाल्याने ते पत्नीपासून दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दरम्यान, फिर्यादीस त्यांची पत्नी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणातून दोघांत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून कानक्‍या याने १३ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे घरी जात असताना त्यांना अडविले. त्यानंतर शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना हाताने मारहाण करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्‍यात व हातावर वार केले. या घटनेत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.