दहा रुपयांच्या रिचार्जमुळे गमावले पाच लाख रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा रुपयांच्या रिचार्जमुळे 
गमावले पाच लाख रुपये
दहा रुपयांच्या रिचार्जमुळे गमावले पाच लाख रुपये

दहा रुपयांच्या रिचार्जमुळे गमावले पाच लाख रुपये

sakal_logo
By

पुणे ः मोबाईलमधील सीम कार्ड सुरू करण्यासाठी दहा रुपयांचे रिचार्ज करण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगारांनी एका नागरिकाच्या बॅंक खात्यातील पाच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. ही घटना शुक्रवारी (ता.२३) घडली असून याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने शुक्रवारी संपर्क साधला. ‘‘तुमच्या मोबाईलचे सीम कार्ड पुन्हा सुरू करायचे आहे का? त्यासाठी दहा रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.’’ असे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून पाच लाख परस्पर काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान, त्यांना त्यांच्या खात्यातून अचानक पाच लाख रुपये कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला होता. संबंधित तक्रार नोंदविल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. गायकवाड करीत आहे.