श्वानाला फेरफटका मारणाऱ्या महिलेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वानाला फेरफटका मारणाऱ्या महिलेचा विनयभंग
श्वानाला फेरफटका मारणाऱ्या महिलेचा विनयभंग

श्वानाला फेरफटका मारणाऱ्या महिलेचा विनयभंग

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : श्वानाला फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना बालेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर महिन्यातही औंध परिसरात पार्टी करून घरी निघालेल्या तरुणींचा विनयभंग करण्यात आला होता, त्यापाठोपाठ आता ही दुसरी घटना घडली आहे.

या प्रकरणी एका महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या नेहमीप्रमाणे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पाळीव श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्या बालेवाडीतील मोझे महाविद्यालय परिसरात आल्या. त्यावेळी एका तरुणाने महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे महिलेने मोठमोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तरुण तेथून पसार झाला. या प्रकरणी त्यांनी तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दिली.