Sun, Feb 5, 2023

युक्रांदच्या कार्यकारिणीची पुनर्रचना
युक्रांदच्या कार्यकारिणीची पुनर्रचना
Published on : 26 December 2022, 4:12 am
पुणे, ता. २६ ः युवक क्रांती दलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता.२४) गांधी भवन येथे पार पडली. यावेळी राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना रचना करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. कुमार सप्तर्षी यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रवींद्र धनक व संदीप बर्वे, कार्यवाह पदी जांबुवंत मनोहर, राज्य संघटक पदी अप्पा अनारसे, राज्य सहकार्यवाह पदी राजकुमार डोंबे व रश्मी पारसकर-सोवनी यांची निवड करण्यात आली. विभागीय पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः मराठवाडा संघटक-श्याम तोडकर, कोकण व पश्चिम महाराष्ट्र संघटक-विजय बोडेकर, कार्यालयीन सचिव व पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे आदी पदाधिकारी निवड करण्यात आली.