Tue, Feb 7, 2023

वनाज ते गरवारे मेट्रो सेवा
आज व उद्या बंद राहणार
वनाज ते गरवारे मेट्रो सेवा आज व उद्या बंद राहणार
Published on : 26 December 2022, 4:27 am
पुणे, ता. २६ ः सिग्नलिंग प्रणालीच्या चाचणीसाठी पुणे मेट्रोची सेवा मंगळवार (ता.२७ )व बुधवार (ता.२८) डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान वनाज ते गरवारे स्थानक दरम्यान बंद राहणार आहे. दुपारी दोन नंतर मात्र या मार्गावरची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक यामार्गीकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही. या मार्गावरील प्रवासी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात नेहमीप्रमाणे सुरू राहील.