‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण आशियाच्या नियुक्त्या जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण 
आशियाच्या नियुक्त्या जाहीर
‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण आशियाच्या नियुक्त्या जाहीर

‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण आशियाच्या नियुक्त्या जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः एसेन्स आणि मीडियाकॉमच्या विलीनीकरणाऱ्या घोषणेनंतर ग्रुपएम इंडियाने नुकतेच ‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण आशियाच्या प्रमुख पदांची नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ‘एसेन्समीडियाकॉम’च्या दक्षिण आशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नवीन खेमका तर, मुख्य धोरण आणि परिवर्तन अधिकारी म्हणून सोनाली मालवीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रुपएमचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार याबाबत म्हणाले, ‘‘नवीन आणि सोनाली या दोघांच्या नेतृत्वाखाली मीडियाकॉम आणि एसेन्स हे सातत्याने एजन्सी व्यवसायांच्या परिवर्तनासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दोन्ही एजन्सी एकत्र आल्याने आता ग्राहकांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याचा आत्मविश्‍वास वाढला आहे. तसेच या विलीनीकरणानंतर आता योग्य सेवांच्या पुरवठ्यासाठी क्षमतांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल.’’ नवीन यांना नेटवर्कवर २५ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांत मीडियाकॉमने नवीन उंची गाठली आहे. तर सोनाली यांनी उद्योग व बाजार यातील व्यवस्थापन आणि माध्यमांचा २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना विविध प्रमुख पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या असून २०२१ मध्ये त्या एसेन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. खेमका या वेळी म्हणाले, ‘‘दोन्ही एजन्सीच्या विलीनीकरणामुळे सर्वोत्तम श्रेणीतील डेटा आणि डिजिटल उपायांसह मला विश्‍वास आहे की आम्ही आमच्या प्रतिभेला भविष्यात सिद्ध करत नवीन सेवा प्रदान करू. त्यामुळे एसेन्समीडियाकॉमद्वारे आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा मिळणार आहे.’’ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायात वाढ करण्याकरिता आज ग्राहकांना मीडिया परिवर्तनाच्या अग्रभागी राहण्याची गरज भासत आहे. दररोज नवे व्यासपीठ विकसित होतात, निर्माते उदयास येतात आणि समुदाय तयार होतात. कन्टेंट, ग्राहक आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर हे बदल होत आहेत, मालवीया यांनी नमूद केले.