महिना उरल्याने वेळेचा उपयोग कार्यक्षमतेने करा ः अरुण जैन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिना उरल्याने वेळेचा उपयोग
कार्यक्षमतेने करा ः अरुण जैन
महिना उरल्याने वेळेचा उपयोग कार्यक्षमतेने करा ः अरुण जैन

महिना उरल्याने वेळेचा उपयोग कार्यक्षमतेने करा ः अरुण जैन

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : ‘जेईई’च्या परीक्षेला एक महिना उरला असल्याने या वेळेचा तयारीसाठी कार्यक्षमतेने उपयोग करा, असा सल्ला एलन करिअर इन्स्टिट्यूटचे केंद्र प्रमुख अरुण जैन यांनी दिला.

‘जेईई’ला अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारीपर्यंत आहे. या वर्षी जेईई-मेन्स परीक्षा देशातील ३९९ शहरांमध्ये आणि परदेशातील २५ शहरांमधून ‘सीबीटी’पद्धतीने घेण्यात येणार आहे, असेही जैन यांनी सांगितले. परीक्षेला जवळपास एक महिना उरला आहे. वर्षभर तयारी सुरू असली तरीही शेवटचा महिना खूप महत्त्वाचा असतो. कारण, वर्षभराची उजळणी आणि परीक्षेतील कामगिरीही या तयारीवर खूप अवलंबून असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची मनापासून तयारी करावी लागते. आधी स्वतःचा अभ्यास करा, किती अभ्यास झाला आहे ते बघा आणि तुमची स्वतःची स्थिती काय आहे हे बघा, असा सल्लाही जैन यांनी दिला.
सरासरी आणि सशक्त विषय मजबूत करण्यासाठी दिलेल्या वेळेत प्रश्न सोडविण्याचा सराव करा. आठवड्यातील विषयांचा सिद्धांत अभ्यास पहिल्या दोन आठवड्यात पूर्ण झाला पाहिजे. तिन्ही विषयांसाठी ‘एनसीईआरटी’द्वारे तयारी करा. कारण, ‘जेईई मेन्स’ पेपर पूर्णपणे ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमावर आधारित आहे. तसेच, दिलेल्या मुदतीत मागील पेपर सोडविण्याचा सराव करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेपूर्वी सुमारे ८ ते १० सपूर्ण अभ्यासक्रमाच्या मॉक टेस्ट द्या. जेईई मेन ही संगणक आधारित (सीबीटी) परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जानेवारीच्या प्रयत्नापूर्वी ‘सीबीटी’ मॉक टेस्ट देण्याचा सल्ला दिला जातो.