किमान तापमानाचा पारा पुन्हा चढला शहरात गारठा झाला कमी; राज्यात ही तापमानात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान तापमानाचा पारा पुन्हा चढला

शहरात गारठा झाला कमी; राज्यात ही तापमानात वाढ
किमान तापमानाचा पारा पुन्हा चढला शहरात गारठा झाला कमी; राज्यात ही तापमानात वाढ

किमान तापमानाचा पारा पुन्हा चढला शहरात गारठा झाला कमी; राज्यात ही तापमानात वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः शहर आणि परिसरात थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे. किमान व कमाल तापमानात ही आता सरासरीच्या तुलनेत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. पुढील पाच दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असून बुधवारी (ता. २८) शहर आणि परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी (ता. २७) शहरात १५ अंश सेल्सिअस किमान तर ३२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत तापमानात ३ अंशांनी वाढ झाली होती. गेल्या आठवडाभरापासून तापमानात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याने गारठा कमी झाला आहे. तसेच दिवसा उकाडा वाढला आहे. दरम्यान, येत्या सोमवारपर्यंत (ता. २) किमान तापमानात अशीच वाढ होण्याची चिन्‍हे असून तापमान १७ ते २० अंशांपर्यंत पोहचू शकते.
राज्यात सध्या काही ठिकाणी अंशतःढगाळ वातावरणाची स्थिती असल्याने तापमानात वाढ झाली आहे. बऱ्याच ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या पुढे आहे. पुढील चार दिवस तापमानातील चढ-उतार असाच कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. राज्यात मंगळवारी नीचांकी तापमानाची नोंद निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ७ अंश सेल्सिअस इतकी झाली. उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट ओसरू लागली असून, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, ओडिशासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे.