‘सीओईपी’तर्फे येत्या शनिवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीओईपी’तर्फे येत्या शनिवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन
‘सीओईपी’तर्फे येत्या शनिवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन

‘सीओईपी’तर्फे येत्या शनिवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः ‘सीओईपी’च्या वतीने येत्या शनिवारी (ता. ३१) सायक्लोथॉन आणि येत्या आठ जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे. विविध महोत्सवांपैकी एक असलेल्या झेस्ट (ZEST) क्रीडा महोत्सवांतर्गत या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

शनिवारी आयोजित केलेली सायक्लोथॉन ही स्पर्धा पूर्णपणे विद्यार्थी नियोजित आहे. त्यादिवशी पहाटे ५.३० वाजता सीओईपी टेक. (COEP Tech) युनिव्हर्सिटीच्या मैदानातून या सायक्लोथॉन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अनुक्रमे १५ आणि ३० किलोमीटरच्या दोन गटांत होणार आहे. यासाठी नोंदणी शुल्क आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, फिनीशर्स मेडल, ई-प्रमाणपत्र, पौष्टिक अल्पोपाहार आणि वेलकम किट भेट देण्यात येणार आहे.

दरम्यान, आठ जानेवारीला आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ५ वाजता सुरू होणार आहे. यामध्ये अनुक्रमे तीन, पाच, पाच किलोमीटर (कॉर्पोरेट) आणि दहा किलोमीटर हे चार गट असणार आहेत. ही स्पर्धाही सशुल्क आहे. यामधील विजेत्यास एक लाख रुपयांपर्यंतची बक्षीसे दिली जाणार आहेत. या दोन्ही स्पर्धांसाठी https://www.coepzest.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.