चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) ‘गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण’
मंदिर कोश यांच्यातर्फे कै. मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी पाहिलेल्या १८ हजार मंदिरांपैकी काही आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन ज्येष्ठ तबलावादक विजय घाटे यांच्या हस्ते होणार असून, प्रदर्शनात दररोज मंदिरांच्या कथा सांगणारे मुकुल कुंटे यांचे व्याख्यान सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे.

कधी ः गुरुवार (ता. २९) ते शनिवार (ता. ३१)
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८
कुठे ः बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता

२) ‘जीवनगाणे’ ः
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवनगाणे’ या पाडगावकर यांच्या कविता, गाणी, किस्से व आठवणींवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निर्मितीची संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची असून त्या व अमित दाते या वेळी गीते सादर करतील. त्यांना केदार परांजपे, नरेंद्र चिपळूणकर, राजेंद्र हसबनीस व ऋतुराज कोरे वाद्यवृदांवर साथसंगत करतील.
कधी ः शुक्रवार (ता. ३०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः निवारा आश्रम सभागृह, नवी पेठ

३) ‘उगम’ ः
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने हार्मोनियम हे वाद्य केंद्रस्थानी ठेवून देशभरातील कलाकारांतर्फे सादर होणारा ‘उगम’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘स्वरानुजा संगीत अकादमी’तर्फे आयोजित या कार्यक्रमात सुरवातीला तन्मय देवचके यांचे देशभरातील ४० शिष्यांचे सादरीकरण आणि त्यानंतर तन्मय देवचके व सहकाऱ्यांचा ‘तन्मय इन हार्मनी’ हा कार्यक्रम सादर होईल.
कधी ः रविवार (ता. १)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः न्यू इंग्लिश स्कूलचे गणेश सभागृह, टिळक रस्ता

४) ‘तेजोमय नादब्रह्म’ ः
ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ‘तेजोमय नादब्रह्म’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पृथ्वी एडिफिसतर्फे करण्यात आले आहे. या वेळी निवेदक मिलिंद कुलकर्णी व विनया देसाई हे फडके यांच्याशी संवाद साधणार असून शिल्पा पुणतांबेकर, मधुरा दातार आणि मंदार आपटे गीतांच्या माध्यमातून फडके यांचा सांगीतिक प्रवास उपस्थितांसमोर उलगडतील. या प्रसंगी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, गायक महेश काळे, लेखक-गीतकार प्रवीण दवणे उपस्थित राहणार आहेत.
कधी ः सोमवार (ता. २)
केव्हा ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट