विवाहास नकार मिळाल्याने तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहास नकार मिळाल्याने तरुणीची आत्महत्या
विवाहास नकार मिळाल्याने तरुणीची आत्महत्या

विवाहास नकार मिळाल्याने तरुणीची आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः प्रियकराने विवाहास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनिता विक्रम सावंत (वय २४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर संग्राम उर्फ पिट्या विलास पानसरे याच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनिताच्या आईने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता व संग्राम हे विवाह करणार होते. दरम्यान, संग्रामने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्याने तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच त्याने विनीतासमवेत विवाह करण्यासही नकार दिला. त्यामुळे विनीताने पाच दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, अंत्यविधी झाल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यामध्ये संग्राम, त्याची आई, मावशी व शेजारी राहणाऱ्या महिलेने विनिताचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.