भारतीय लष्कराची दुर्गम गावांमध्ये विशेष मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय लष्कराची दुर्गम गावांमध्ये विशेष मोहीम
भारतीय लष्कराची दुर्गम गावांमध्ये विशेष मोहीम

भारतीय लष्कराची दुर्गम गावांमध्ये विशेष मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. ३०) ‘ग्रामसेवा-देश सेवा’ संकल्पनेवर आधारित एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत लष्कराचे जवान ७५ दुर्गम भागातील गावांना भेटी देत अग्निपथ योजनेसंबंधी जनजागृती करणार आहेत, तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवणार आहेत. ही मोहीम महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील ७५ दुर्गम गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेमध्ये सैनिक गावकऱ्‍यांसोबत सामील होणार आहेत. तसेच व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या क्रीडा स्पर्धांवरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी या गावांमधील युवक आणि विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण सामने खेळवले जाणार आहेत. येथील महिलांच्या ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केल्या जातील. लष्कर ग्रामीण भागातील लोकांशी जोडण्यासाठी आणि तेथील गावकऱ्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याकरिता ही महत्त्वपूर्ण मोहीम पार पाडत आहे.