Fri, Feb 3, 2023

नववर्षासाठी सी-सिक्रेटचे
खवय्यांसाठी खास पॅकेज
नववर्षासाठी सी-सिक्रेटचे खवय्यांसाठी खास पॅकेज
Published on : 30 December 2022, 10:05 am
पुणे, ता. ३० ः जंगली महाराज रस्त्यावरील सी सिक्रेटने फूडप्रेमी आणि शाकाहारींसाठी नवीन वर्षासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला संध्याकाळी एक बुफे आणि कॉम्बोजची व्यवस्था केली आहे. ‘सी सीक्रेट’ ही अस्सल आणि विशिष्ट पाककृतींमध्ये प्रसिद्ध आहे. सी-फूडची विस्तृत श्रेणी आणि ड्रिंक्सच्या परिपूर्ण निवडीसह भारतीय स्वादिष्ट पदार्थ येथे आहेत. नववर्षानिमित्त नॉन-व्हेजिटेरिअन्ससाठी बुफेमध्ये १२९९ रुपयांचे पॅकेज असून त्यात चिकन मालवणी, मटन रोगन गोश, फिश फिंगर्स, मीठ आणि मिरपूड कोळंबी, फिश टिक्का आदी खाद्य पदार्थांचा समावेश असेल. शाकाहारी खवय्यांसाठी ७९९ रुपयांचे पॅकेज असून पनीर बंजारा टिक्का, बिर्याणी, सीख कबाब, लाइव्ह अॅपम स्टॉल आदींचा समावेश आहे.