Tue, Jan 31, 2023

‘वंचित’बरोबर आघाडीचा प्रस्ताव नाही : तिवारी
Gopal Tiwari : ‘वंचित’बरोबर आघाडीचा प्रस्ताव नाही; गोपाळ तिवारी
Published on : 30 December 2022, 1:17 pm
पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका वा नगरपरिषदांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे युती अथवा आघाडीबाबत प्रस्ताव दिला असल्याचे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच म्हटले आहे. त्याबाबत तिवारी म्हणाले, ‘‘वंचितचे प्रियदर्शिनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल्ल गुजर हे मला पुण्यात भेटले.
त्यावेळी ‘धोरणात्मक स्पष्टता दर्शवणारा’ कोणताही लेखी प्रस्ताव आल्यास, आपण तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पक्षश्रेष्ठींसमोर मांडू, असे स्पष्ट केले होते.’’