Wed, Feb 8, 2023

परदेशी विद्यार्थ्यांसोबत
नाताळ, नववर्षाचे स्वागत
परदेशी विद्यार्थ्यांसोबत नाताळ, नववर्षाचे स्वागत
Published on : 30 December 2022, 10:32 am
पुणे, ता. ३० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमवेत नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत केले. विद्यापीठात विविध देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहतात. घरापासून लांब असल्याने त्यांना अनेकदा सण साजरे करणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, भारतीय सांस्कृतिक सबंध परिषदेचे उपविभागीय संचालक निशी बाला आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.